आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनांचा लाभ:शिष्यवृत्तीसाठी पाच दिवस मुदत

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने या कार्यालयामार्फत अनुसूचित‎ जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार‎ शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षी‎ छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व‎ विद्यावेतन योजनांचा लाभ देण्यात येतो. अकरावी ते पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या‎ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे‎ आवाहन केले आहे.

सर्व योजना mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरून‎ ऑनलाइन राबवण्यात येतात.‎ कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व‎ बारावीच्या सर्व शाखांसाठी नवीन अर्ज दाखल‎ करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली‎ आहे. तर नूतनीकरणास १५ ऑक्टोबरपर्यंत‎ मुदत आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या‎ नवीन अर्जासाठी १५ ऑक्टोबर तर‎ अर्ज नुतनीकरणासाठी २० ऑक्टोबरपर्यंत‎ कालावधी आहे. तर वरिष्ठ‎ महाविद्यालयात व्यवसाय अभ्यासक्रम नवीन विद्यार्थ्यांसाठी ११‎ तर नूतनीकरणासाठी ३१‎ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...