आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठित नागरिकांना १२ ठिकाणी मिळणार मान:सतरापैकी पाच अमृत सराेवरांवर रस्ता नसल्याने हाेणार नाही ध्वजाराेहण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील सतरापैकी १२ अमृत सरोवरांवर ध्वजारोहण हाेईल. प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली आहे. माजी सैनिक, सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून ध्वजारोहण करण्यात येईल. दरम्यान, चार ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथे स्वातंत्र्यदिनी ध्वजाराेहण हाेणार नाही.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ‘अमृत सरोवर’ तयार करण्यात आले आहेत. पावसाचे पाणी संग्रहित करण्यासाठी व भूजलस्तर वाढवण्यासाठी सरकारने तलावांना अमृत सरोवर विकसित करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यतील दुरवस्था झालेल्या तलावांना अमृत सरोवरांप्रमाणे विकसित करण्यात आले आहे. जुन्याच तलावांना अमृत सरोवरांत रूपांतरित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, रोजगार हमी याेजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला. या अमृत सरोवरांवर ध्वजारोहण हाेईल. त्यासाठी या सरोवरांजवळ झेंडा लावण्यासाठी चबुतरा तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनी रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील हे अमृत सरोवराच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यात ७५चे उद्दिष्ट
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर तयार करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून देण्यात आले होते. पण अद्यापपर्यंत केवळ सतरा अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले. पाच अमृत सरोवरांकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे सतरापैकी बारा सरोवरांजवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या ठिकाणी रस्ता नाही
अभाेणे तांडा, मुंगी तलाव (ता.चाळीसगाव), वरखेडी तलाव, नागदुली तलाव, विखरण तलाव (एरंडाेल) येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे या ठिकाणी ध्वजाराेहण हाेणार नाही.
या ठिकाणी ध्वजाराेहण : आडगाव तलाव (ता.चाळीसगाव), ब्राम्हणशेवगे गाव तलाव (ता. चाळीसगाव), पाझर तलाव खर्ची खुर्द (ता. एरंडोल), पाझर तलाव कंडारी (ता. जळगाव), तालखेडे तलाव (ता. मुक्ताईनगर), पाझर तलाव गलवाडी (ता. रावेर), पाझर तलाव वाकी (ता. बोदवड), गाव तलाव वराड बुद्रुक (ता. बोदवड), गाव तलाव कुऱ्हाड बुद्रुक (ता. पाचोरा), तारखेडा तलाव १ आणि तारखेडा तलाव २ (ता. पाचोरा).

बातम्या आणखी आहेत...