आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवड्यात नरवेल (ता.मुक्ताईनर) फाट्यावर दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिकाला लुटले होते. त्याच्याकडील सोने,चांदाचे दागिने व रोख रक्कम मिळून १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केला होता. जळगाव एलसीबीने या टोळीतील ५ जणांना जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एस. राजकुमार यांनी रविवार दिली.
एसपी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबी पीआय किसन नजनपाटील उपस्थित होते. नरवेल फाट्यावर सराफाला लुटल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दराेड्यातील आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची कुणकुण एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना लागली.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमूल देवढे, उपनिरीक्षक गणेश चौबे, रवी नरवाडे, अनिल जाधव, युनूस शेख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित सुनील मिस्त्रीलाल जाधव (वय-२३, रा.अंजाळे ता.धुळे ह.मु. मच्छी बाजार, सुप्रीम कॉलनी), प्रकाश वसंत चव्हाण (वय-३०, रा.भिकनगाव, मध्य प्रदेश ह.मु. सुप्रीम कॉलनी), आकाश दिलीप पवार (वय २४ रा.लोणवाडी ता.जळगाव ह.मु. भवानी चौक सुप्रीम कॉलनी), विशाल देविदास मराठे (वय-२३ रा. रायपूर कंडारी) आणि विनोद विश्वनाथ इंगळे (वय ३४ रा.उचंदा ता. मुक्ताईनगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ८० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या पाचही संशयितांना मुक्ताईनगर पोलिसांकडे सोपवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.