आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा कोरोना:बाहेर राज्यात पोटाची उकळी न भागल्यामुळे चोरट्या मार्गाने केला जिल्ह्यात प्रवास

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या कंपनी मध्ये कामावर असलेल्या कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचा प्रकार इंदुर येथे घडला

देशातील अनेक राज्यांमध्ये मजूर वर्ग लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था शासनाकडून व संबंधित व्यक्तींजडून केली जाते. मात्र कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या पोटाची उकळी न भागल्यामुळे त्या पाच जणांनी चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवास केला असल्याचे निदर्शनास आले आहे.

मध्यप्रदेश राज्यातील इंदुर जिल्ह्यातील महू येथे असलेल्या इंडिया प्रा. लिमिटेड या खाजगी कंपनीमध्ये वर्धा जिल्ह्यातील पाच युवक नोकरी करिता स्थायी झाले होते. कोरोना आजाराने हाहा:कार केला असल्याने, केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर  अनेक राज्यातील मजूर वर्ग त्याच ठिकाणी अडकले होते.मजूर कामगारांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटनांनी  घेतली असल्यामुळे त्यांना सोयीचे झाले.मात्र मोठं मोठ्या कंपनी मध्ये कामावर असलेल्या कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचा प्रकार इंदुर येथे घडला आहे.

पाच युवकांजवळ असलेल्या पैशांमध्ये २० दिवस जेवणाची व्यवस्था झाली.जवळ असलेले पैसे खर्च झाल्यामुळे त्याची पोटाची उकळी भागत नसल्यामुळे त्या पाच जणांनी गावी येणाचा निर्णय घेतला. अनेक राज्यांच्या सीमा ओलांडून नयेत याकरिता नाकेबंदी करण्यात आली असल्यामुळे या पाच युवकांनी १३ एप्रिल  रोजी चोरट्यामार्गाने गावाचा रस्ता धरला.जिल्ह्यात येण्यासाठी कधी मोटर सायकल ची मदत तर कधी मालवाहू वाहनांमध्ये बसून यांनी बुट्टीबोरी गाठले.या चोरट्या मार्गाच्या प्रवासात पोलिसांनी मदत केली असल्याचे सांगितले जात आहे.वर्धा जिल्ह्यातील कृणाल सुखदेव वाढई (वय १८) गजानन भाऊराव भट (वय १८) दोघेही (रा हिंगणी) निलेश हरिदास ढोले (वय २५ )आशीष शंकर उईके (वय २२) व मनोज दिलीप लाकडे (वय २२) तिघेही (रा पवनार) हे पाचही युवक वर्धा जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती हिंगणी येथील पोलीस पाटील मारुती चचाने यांना कळताच, त्यांनी केळझर येथील पोलीस पाटील खंडाते यांना पाच युवक मालवाहू वाहनाने येत असल्याची माहिती देण्यात आली.खंडाते यांनी सेलडोह येथील असलेल्या चेकपोस्ट वर वाहन थांबविण्यास सांगितले,पोलिसांनी मालवाहू वाहनाची तपासणी केली असता,पाच युवक चोरट्या मार्गाने प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली.पाचही युवकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कृणाल वाढई या युवकाला जास्त प्रमाणात ताप असल्यामुळे त्याला सेलू येथील विद्यादीप येथे १३ दिवस विलगिकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...