आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:विसर्जन मिरवणुकीवर फुलांची केली उधळण

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नियाज अली फाउंडेशनचा उपक्रमराष्ट्रीय एकात्मता, सद्भावना वाढून शांती व एकोपा वाढवण्यासाठी सलग ५२ वर्षांपासून सै. नियाज आली फाउंडेशनतर्फे विसर्जन मिरवणुकीवर फुलांची उधळण करण्यात येत आहे.

सर्व प्रथम हिंदू बांधव व प्रशासनातर्फे पीर लाल शहा बाबा यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व गणेश मंडळांचे भिलपुरा चौकात आगमन झाल्यावर गणेश मंडळांचे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केलेे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड सै. अयाज अली नियाज अली, शेख सलीमुद्दीन, शकूर बादशहा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...