आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी क्लासमधील धक्कादायक प्रकार:गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला अर्धनग्न करून दिली अभ्यासाची शिक्षा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गृहपाठ (हाेमवर्क) केला नाही म्हणून चाैथीत शिकत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाला चक्क अर्धनग्न अवस्थेत क्लासमध्ये उभे राहून अभ्यास करण्याची शिक्षा पल्लवी जितेंद्र इंदाणी या शिक्षिकेने दिली. जळगाव शहरातील एका खासगी क्लासमधील धक्कादायक प्रकार समाेर आला. याप्रकरणी पीडित पाल्याच्या वडीलांच्या तक्रारीवरून शहर पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात आली.

महापालिकेत सफाई कामगारपदी कार्यरत याेगेश जितेंद्र ढंढाेरे (रा. शनिपेठ, गुरुनानकनगर) यांचा मुलगा खुशाल (9) हा प्राेग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चाैथीत शिकताे आहे. बळीराम पेठेत काेठारी क्लासेसमध्ये त्याला महिनाभरापूर्वी शिकवणी लावली. गेल्या काही दिवसांपासून खुशाल हा वडील याेगेश यांच्याकडे क्लासमध्ये मारहाण केली जाते अशी तक्रार सतत करत हाेता. त्याची खात्री करण्यासाठी व शिक्षकांना भेटण्यासाठी याेगेश ढंढाेरे शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास काेठारी क्लासमध्ये गेले हाेते. तेव्हा क्लासचा दरवाजा लाेटलेला हाेता. दाराच्या फटीतून ढंढाेरे यांना त्यांचा मुलगा खुशाल हा एका बाजूला टी-शर्ट काढून हातात पुस्तक घेऊन उभा राहून वाचन करत असल्याचे दिसले.

मोबाइल भावाने उचलला, प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले

याबाबत संबंधित शिक्षिकेच्या माेबाइलवर संपर्क साधला असता ताे त्यांच्या भावाने उचलला व त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. तसेच क्लासच्या संचालकांचा नंबर देण्यास असमर्थता दर्शवली. याेगेश ढंढाेरे यांनी शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पनाका रजिस्टरला भादंवि 323 नुसार नाेंद करण्यात आली आहे. शहर पाेलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...