आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी शाळा:सत्तेसाठी फोडाफोडी तशीच इंग्रजी शाळेतील मुले मराठीकडे वळवा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेसाठी आमदार फोडले जातात तसे इंग्रजी शाळेतील मुले मराठीकडे वळवण्याची वेळ आली आहे. परिपूर्ण बदलांमुळे पालकही मुलांना या शाळांमध्ये टाकत आहेत. विधानसभेतील २८८ आमदारांपैकी बहुतांश आमदार शुगर, बी.पी. वाले आहेत मात्र शिक्षक संयमी व समाधानी असल्याने ते पूर्ण निरोगी असून कुठेही भरकटलेले नाहीत. शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवावे, शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. सोमवारी शिक्षक दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे सभागृहात शिक्षक पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. यावेळी तीन वर्षांतील ४८ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवून प्राथमिक शिक्षणाचा चेहरा बदलवण्याचा प्रयत्न केला. यात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इंग्रजी माध्यमाच्या जमान्यात मराठी शाळा आपले अस्तित्व टिकवून आहेत. आज सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, मात्र शिक्षक याला अपवाद असल्याचे मंत्री पाटील म्हणालेे. विविध निधींतून ३५० शाळांना संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. अनेक गावात पत्त्यांचा व गैरकामांचा अड्डा बनलेल्या जि.प.शाळा आता बदलल्या आहेत. मराठी माध्यमाची पटसंख्या वाढली आहे. १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून हा बदल होत आहे. जिल्ह्यातून १७ शाळांची मॉडेल स्कूलमध्ये निवड झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

जि.प. प्रशासनाने १६ कलमी कार्यक्रम राबवल्याबद्दल सीईओ डॉ. पंकज आशिया यांचा विशेष सन्मान मंत्री पाटील व आमदारांनी केला. व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, शिक्षक आमदार डाॅ. सुधीर तांबे, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, नीळकंठ गायकवाड यांनी आजची शिक्षण पद्धती व बदलांच्या गरजेवर मनोगत व्यक्त केले. महापौर जयश्री महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...