आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय:एमपीएससीतर्फे वनसेवा परीक्षा 3 ऑक्टोबरला

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता येत्या ३ आॅक्टोबर रोजी होणार आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचे काही पेपर आणि वनसेवा मुख्य परीक्षा एकाच दिवशी २४ सप्टेंबरला होणार असल्याने परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

एमपीएससीने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, आता वनसेवेची मुख्य परीक्षा ३ आॅक्टोबरला घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही परीक्षांसाठी प्रविष्ट परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससीतर्फे ८ आॅक्टोबरला दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ घेतली जाणार आहे. दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक हे पद प्रथमच एमपीएसीद्वारे भरले जात असल्याचे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...