आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट स्वाक्षरी करुन पतीकडून पत्नीचीच फसवणूक:फ्लॅट विक्रीसाठी पाॅवर ऑफ अटर्नी नसताना खोटे स्टॅम्पपेपर बनवले; गुन्हा दाखल

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लॅट विक्रीचा व्यवहार रद्द करण्यासाठी पत्नीने पॉवर ऑफ अ‌ॅटर्नी दिली नसताना तिची बनावट स्वाक्षरी करुन पतीने खोटे स्टॅम्पपेपर बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम अभिषेक शर्मा (वय 32, रा. नेहरुनगर) ह्या बंगळुरू येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. 2015 मध्ये त्यांचा विवाह अभिषेक सूनील शर्मा (वय 32, रा. आदर्शनगर) यांच्याशी झाला आहे. अभिषेक देखील कर्नाटकात नोकरी करतात. ऑक्टोबर 2019 मध्ये बंगळुरू येथे एकूण 79 लाख 32 हजार रुपये किमतीचा फ्लॅट बुक केला. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी आठ प्रमाणे 16 लाख रुपये अडव्हान्स म्हणून दिले.

हा फ्लॅट हा दोघांच्या नावे रजिस्टर केला होता. याचदरम्यान पती-पत्नीचा वाद झाल्याने पुनम शर्मा सध्या माहेरी राहत आहेत. तर अभिषेक शर्मा यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करण्यासाठी पत्नी पूनम शर्मा यांना न सांगता पावर ऑफ अँटर्नीसाठी 500 रुपये स्टॅम्प पेपरवर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी फ्लॅट खरेदीचा सौदा रद्द केला. तसेच बँकेचे लोन देखील रद्द केले. यानंतर पूनम शर्मा यांना चार लाख रुपये परत केले.

पूनम यांनी संबधित प्रकरण माहिती पडल्यानंतर त्यांनी बँक, कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधुन व्यवहार रद्द कसा झाला याची विचारणा केली. आपली बनावट स्वाक्षरी पतीने केल्याचे पूनम यांच्या लक्षात आले. पतीने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पूनम यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे पती अभिषेक शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...