आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा:शिक्षणमहर्षी माजी आमदार डॉ.सुरेश जी.पाटील ९५ व्या वर्षी कालवश

चोपडा2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चोपडा तालुक्यातील पहिले एमबीबीएस डॉक्टर म्हणून दिली होती सायकलीवर सेवा

प्रवीण पाटील 

चोपडा तालुक्याचे माजी आमदार डॉ. सुरेश जी. पाटील यांनी आज वयाच्या ९५ व्या वर्षी १ मे रोजी दुपारी साडे चार वाजता वृद्धपकाळाने त्याचे निधन झाले. कोरोनामुळे त्याच्या राहत्या घरी सोशल डिस्टन्स ठेऊन त्याच्या चाहत्यांनी अंत्यसंस्कार पूर्वी दर्शनाच्या रांगा लावल्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच त्यांच्या चाहत्यांनी आजच त्यांचे अंत्यदर्शन घेतले. लॉकडाउनमुळे उद्या त्यांच्या अंत्यविधीला गर्दी करता येणार नाही.

सुरेश पाटील यांचा परिचय

डॉ सुरेश जी पाटील यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९२५ रोजी होळ ता.शिंदखेडा येथे शेतकरी कुटुंबात झाला होता.त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चोपडा तालुक्यातील हातेड येथे झाले असून वैद्यकीय शिक्षण बडोदा, गुजरात येथे झाले आहे. चोपडा येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून आजवर वैद्यकीय सेवा केली.ते चोपडा तालुक्यातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होते.त्यांनी चोपडा तालुक्यात सायकलीवर जाऊन खेडोपाडी वैद्यकीय सेवा दिली होती.

नामपूर ता.सटाणा जि.नाशिक येथील कै.श्री.धर्मराज जयदेवराव सावंत व कै.सौ.वासंतिकाताई सावंत यांच्या उच्च शिक्षित थोरल्या कन्या माजी मंत्री शरदचंद्रिका पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डॉ सुरेश जी पाटील यांनी समविचारी शिक्षणप्रेमी मंडळी यांना एकत्र घेवून १९६९ मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना करून कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले.

माजी मंत्री स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळात महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र विभागात मानद प्राध्यापक म्हणून सेवा दिली. डॉ सुरेश जी पाटील यांच्या धर्मपत्नी कै.ना.स्व शरदचंद्रिका पाटील यांना १९८२ साली तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.परंतू ५ डिसेंबर १९८२ रोजी त्यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर १९८२ साली कै.ना.स्व शरदचंद्रिका पाटील यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत डॉ.सुरेश जी.पाटील विधान सभेवर निवडून गेलेत.

त्यानंतर डॉ.सुरेश जी.पाटील यांनी सूतगिरणी सुरु करण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत.आणि चोसाका उभा करण्यासाठी स्व धोंडू उखाजी पाटील यांना खंबीर साथ दिली होती.  महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत पदविका,पदवी व पदव्युत्तर औषध निर्माण महाविद्यालय,तंत्रनिकेतन पदविका विद्यालय,शिक्षण शास्र विद्यालय,नर्सिंग विद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय,महात्मा गांधी व कस्तुरबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,ऑक्सफर्ड इंग्लिश मेडियम स्कुल आदी शैक्षणिक विद्या शाखा सुरु केल्यात.तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कर्जाणे येथे वि.प्र. देशमुख पोस्ट बेसिक आश्रम प्राथमिक,माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय सुरु केलेत.

डॉ.सुरेश जी.पाटील व  कै.ना.स्व शरदचंद्रिका सुरेश पाटील यांचा मोठा परिवार असून त्याच्या पश्च्यात तीन मुली,दोन मुले,सुना,नातवंडे,असा परिवार आहे. शैला,सुष्मा,शुभांगी तीन मुली व  डॉ.शेखर पाटील हे मुबंई मध्ये वैदयकीय सेवा देत असून अँड.संदीप पाटील हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.स्नुषा डॉ स्मिता पाटील ह्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव आहेत.    डॉ सुरेश पाटील हे आजीवन काँग्रेस पक्षाचे व गांधी विचारांचे पाईक राहिलेत.काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिलेत पण काँग्रेस पक्षाची साथ शेवटपर्यंत सोडली नाही.आज त्यांनी दुपारी साडे चार वाजता चोपडा शहरातील नृसिंह हॉस्पिटलमध्ये आपला शेवटचा श्वास घेतला.

स्व डॉ सुरेश जी पाटील ही व्यक्ती नसून ते प्रेरणां शक्ती होती.मधुर स्वभाव माणस जोडण्याची कला,माणुसकीने ओथबलेलं अस एक गुणवान व्यक्तिमत्त्व होते.६५ वर्षांपूर्वी चोपडा शहरात वैद्यकीय सेवा सुरू केली.लोकप्रिय आणि आदर्श डॉक्टर म्हणून नाव कमविले.चोपडा तालुक्यात कदाचित असं एक ही घरं नाही की डॉ सुरेश पाटील हे पोहचले  नाही.त्याचे स्मित हास्य अनेक रुग्णांना बरे करत असे. स्व शरडचंद्रिका पाटील माजी शिक्षण मंत्री व डॉ सुरेश पाटील यांच्या माध्यमातून जिद्द आणि चिकाटीचे त्यांनी चोपडा येथे शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कार्य केले,सर्व प्रकारच्या विद्या शाखा त्याचा कॉलेज मध्ये आहेत.शिक्षण क्षेत्रातील त्याचं मोठं योगदान तालुका कदापि विसरणार नाही.राजकारणात त्यांनी आदर्श निर्माण केला.विरोधात राजकीय व्यक्तीवर देखील त्यांनी प्रेम केले होते ते बहुभावीक होते.त्यांनी आयुष्यभर सर्व धर्म समभाव झोपसला.त्याच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहेत.स्व शरदचंद्रिका पाटील व स्व डॉ सुरेश पाटील याचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आहे.-अरुण गुजराथी माजी विधानसभा अध्यक्ष

"मी प्रत्यक्ष देव पाहिला नाही,पण माणसातील देवमाणूस पाहिला

डॉ सुरेश जी पाटील यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचाच घटक मानले व ते म्हातारे झाल्यावर देखील त्यांना त्यांचे कुटुंब कसे चालेल ती सारी मदत केली. ज्या काळात सारे लोक पैश्यांच्या मागे लागून जमीनी चे प्लॉट पाडली जात होते,तेव्हा देखील दादा शैक्षणिक संस्थेसाठी जमीन घेऊन मुलांना घडवण्यासाठी धडपडत होते.   मला नेहमी म्हणायचे संजू मला कुणाकडे लाचार म्हणून राजकारणासाठी नेऊ नको.मला कोणतेही पद नको,मी समाधानी आहे.त्यांचा मानस पुत्र होणेचे भाग्य मला मिळाले मी धन्य झालो.आमचाच नाही असंख्य गोरगरिबांचा व धर्मनिरपेक्ष बापास भावपूर्ण श्रद्धांजली....!! एस बी पाटील सुकाणू समिती सदस्य महाराष्ट्र राज्य

बातम्या आणखी आहेत...