आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षेस स्थगिती:माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंच्या शिक्षेस स्थगिती

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुल प्रकरणात दाेषी ठरविण्यात आलेले माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंसह भाजपचे नगरसेवक दत्तात्रय काेळी यांच्या शिक्षेला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दाेघांचाही निवडणूक लढण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. माजी आमदार सुरेश जैन यांना जामीन मंजूर झाल्यानंतर याच प्रकरणात दाेघांना माेठा दिलासा मिळाला आहे.

घरकुल घाेटाळ्यात ३१ आॅगस्ट २०१९ राेजी ४८ जणांना दाेषी ठरवले हाेते. त्यात काही महिन्यातच माजी आमदार जैन वगळता उर्वरीत आराेपींना जामीन मंजूर झाला हाेता. दरम्यान, प्रा. चंद्रकांत साेनवणे व नगरसेवक दत्तात्रय काेळी यांनी सर्वाेच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते. त्यात गुरूवारी सुनावणी झाली.

बातम्या आणखी आहेत...