आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार:माजी आमदार वाघ यांचा भाजप-शिंदेसेनेला धक्का

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक राजकारणाच्या वाटाघाटीतून दूध संघावर बिनविराेध वर्णी लागलेल्या माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाच दिवसांपासून राजकीय भूमिकेवर माैन बाळगून सर्वांना बुचकळ्यात टाकले हाेते. दरम्यान, त्यांनी शनिवारी राष्ट्रवादी नेत्यांसाेबत पॅनलच्या प्रचारात उतरून त्यांना बिनविराेध करणाऱ्या भाजप-शिंदेसेनेला धक्का दिला.

दूध संघ निवडणुकीत माघारीच्या दिवशी शिंदेसेनेचे आमदार किशाेर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप वाघ यांना बिनविराेध निवडून आणले. वाघ यांनीदेखील आपण भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये जात असल्याचे जाहीर केले हाेते. दरम्यान, दाेन्ही पॅनलकडून वाघ आपल्याच पॅनलचे असल्याचा दावा केला जात हाेता. निवडणूक कार्यक्रम पूर्ववत जाहीर झाल्याने शनिवारी पुन्हा दूध संघाचा प्रचार सुरू झाला. या प्रचारात राष्ट्रवादीचे पॅनलचे आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री डाॅ.सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, अॅड. रवींद्र पाटील हे पाचाेरा तालुक्यात गेले हाेते. या वेळी माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसाेबत पॅनलचा प्रचार करताना दिसल्याने भुवया उंचावल्या.

बातम्या आणखी आहेत...