आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:जुन्या भांडणाच्या वादात चौघांची तरुणास मारहाण ; घटना देवकर महाविद्यालयाच्या मागे घडली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या भांडणातून उफाळलेल्या वादात एका तरुणास चौघांनी आसारीने मारहाण केली. ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२.३० वाजता शिरसोली रस्त्यावरील देवकर महाविद्यालयाच्या मागे घडली. योगेश घनश्‍याम पाटील (वय ३५, रा. शिरसोली) हा दुचाकीने देवकर महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शिरसोली रस्त्यावरून जात होता. त्यावेळी रवींद्र लक्ष्‍मण बुंदे (रा. शिरसोली) व त्याच्या सोबत इतर तीन अनोळखी तरुणांनी योगेशची दुचाकी अडवली. मागील भांडणाच्या कारणावरून रवींद्रसह चौघांनी लोखंडी आसारी, पाइपाने योगेशच्या डोक्यात वार केले. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. योगेशवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी योगेशने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र राठोड तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...