आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव शहरात काहीही कारण नसतांना घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या चौघांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी मनपा कर्मचाऱ्यावर चॉपर व फायटरने हल्ला केला. शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय प्रभाकर बागुल (वय ५२, रा. दांडेकरनगर, पिंप्राळा रोड) हे जखमी झाले आहे. बागुल हे महानगरपालिकेत वाहनचालक म्हणून नोकरीला आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजता ते घरात आई-वडीलांसोबत गप्पा मारत होते. यावेळी अंगणात उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर चार तरुण जोरजोरात थापा मारून शिवीगाळ करत होते. यामुळे बागुल यांनी बाहेर येऊन त्या तरुणांना हटकले. याचा राग आल्यामुळे महेंद्र समाधान सपकाळे (रा. बुध्दनगर), उमाकांत वाघ (रा. मिराबाई नगर पिंप्राळा), राकेंश मिलींद जाधव (रा. मढी चौक, पिंप्राळा) आणि एक अनोळखी तरुण अशा चौघांनी बागुल यांच्यावर चॉपर व फायटरने वार केलेे.
लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घराच्या कपांऊंडमध्ये घुसून बागुल यांच्या आईवडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात बागुल गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्या एकाचा मोबाइल बागुल यांच्या कपांउंडमध्ये पडला होता. हा मोबाइल त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी नीलेश पाटील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.