आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नात पारंपरिक दागिन्यांच्या तुलनेत स्वत:साठी मंगळसूत्रापासून वेगवेगळे दागिने मुंबईतील लेटेस्ट डिझाइनसाेबत आॅनलाइन डिझाइनचेच असावे याकडे तरुणींचा कल वाढताे आहे. सिझन सुरू झाल्याने लग्नसराईच्या साेने खरेदीसाठी येणाऱ्या दहापैकी चार तरुणींना आपल्या लग्नासाठी असे स्पेशल डिझाइनचे दागिने हवे आहेत. त्यामुळे सतत नवनवीन डिझाइनच्या दागिन्यांची घडवणुकीचे आव्हान कारागिरांपुढे आहे.
साेन्याचे आकर्षण सर्वांनाच असते, त्यात महिलांना अधिक. पूर्वी लग्नात वधूसाठी लागणाऱ्या साेन्याच्या दागिन्यांची निवड घरातील थाेरामाेठ्यांकडून केली जात असे. दाेन दशकांपासून वधूच्याच पसंतीला प्राधान्य हाेते; परंतु आता त्याही पुढे जाऊन विशिष्ट डिझाइनचेच दागिने हवे यासाठी तरुणी आग्रही आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई सराफात साेन्याच्या दागिन्यांचे नवनवीन डिझाइन सर्वात अगाेदर येतात. ते डिझाइन काही महिन्यांनी देशभरातील सराफात पाेहाेचतात. त्याचे तरुणाईला अधिक आकर्षण असते. त्यासाेबतच काही विशेष डिझाइनरतर्फे हे डिझाइन वेबसाइटवर उपलब्ध करून देतात.
लग्नसराई काळात नव्या डिझाइनला अधिक पसंती बाजारपेठेत सतत नव्या डिझाइनची प्रतीक्षा असते. दर महिन्याला नव्याने येणाऱ्या डिझाइनचे मागणीनुसार दागिने घडवले जातात. काही डिझाइनला जास्त पसंती मिळाल्यावर ते चलनात अधिक काळ चालतात. बाकीचे मागे पडतात; परंतु त्यासाेबतच आता तरुणी िवशिष्ट डिझाइनचे फाेटाे साेबत घेऊन येऊन त्या प्रमाणेच दागिना घडवण्यासाठी आग्रही असतात. - किरण पाताेंडेकर, सुवर्ण कारागीर व व्यावसायिक, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.