आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचा आरोप:शिंदे - फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळेच फॉक्सकॉन गुजरातमध्ये; दबाव निर्माण करण्याचे आवाहन

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे - फडणवीस सरकारचे लक्ष नसल्यामुळेच फॉक्सकॉन - वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या वादाला उकळी फुटणार आहे.

फॉक्सकॉन - वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरून आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक होत सरकारवर हल्लाबोल केला. आता पुन्हा एकदा खडसेंच्या आरोपाने वातावरण तापण्याची शक्यताय.

काय म्हणाले खडसे?

राज्य सरकारच्या दुखऱ्या वेदनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बोट ठेवले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरीत होतायत, ही दुर्दैवी बाब आहे. कोणतेही सरकार असले, तरी इथला उद्योग तिकडे स्थलांतरीत होऊ नयेत.

शासनाची भूमिका नाही

खडसे पुढे म्हणाले की, गुजरातच नाही कर्नाटक असो वा आंध्र असो. कुठल्याही प्रदेशामध्ये इथला उद्योग जाता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने एखादा उद्योग स्थलांतरीत झाल्यानंतर समाजामध्ये प्रतिक्रिया खूप कमी उमटतात. त्यामुळे आपला दबाव शासनावर नसल्यामुळे आणि शासनाची भूमिका स्पष्ट नसल्याने असे उद्योग स्थलांतरीत होत आहेत.

रोजगारावर पाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प राज्यात येणार असल्याचे विधानसभेतील भाषणात सांगितले होते. त्यानंतरही हा प्रकल्प राज्याबाहेर त्यातही गुजरातमध्ये गेला. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी याविरोधात जोरदार आघाडी घेत आंदोलन केले. शिवाय हा प्रकल्प गेल्यामुळे दोन लाख रोजगार गुजरातमध्ये गेल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.

बातम्या आणखी आहेत...