आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक अधिकाऱ्यांची दिशाभूल:बनावट कागदपत्रांच्या मदतीने साडेपाच लाखांची शिष्यवृत्ती लाटली; दोघांविरोधात गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश बहुद्देशीय संस्थेचे काॅलेज ऑफ इंजिनिअरींग व टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सीटी हे बांभाेरी येथे आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्राचार्य या तीघांच्या नावाने संस्थेचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यात शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे टाकले जातात. दरम्यान, संस्थाध्यक्षा यांचे पती रतीलाल वना पाटील (रा. शिव कॉलनी) व उपाध्यक्षा यांचे पती विलास दत्तात्रय नायर (रा. प्रभुदेसाई नगर) या दोघांनी 12 मे 2018 ते 24 जून 2021 या कालावधीत बँक व्यवहारात कोणालाही विश्वासात न घेता स्वाक्षरी बदलण्याची प्रक्रिया केली.

यानंतर बनावट ठराव करुन खोटे कागदपत्र जोडून प्राचार्य सचिन भिमराव पाटील यांच्या स्वाक्षरीचा अधिकार काढून घेेतला. बँकेत नवीन स्वाक्षरी कार्ड न घेता जुन्या कार्डवरच व्हाईस प्रेसीडेंट असा शिक्का मारुन घेतला. बँक अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे वेळोवेळी 5 लाख 61 हजार रुपये काढून घेतले. संगनमत करुन संस्था व बँकेची फसवणूक, अपहार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राचार्य सचिन पाटील यांनी गुरूवारी धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रतीलाल पाटील व विलास नारय या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...