आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 लाखांना चुना:मिरची व्यापारी असल्याचे भासवून केली फसवणूक ; पाेलिसांत गुन्हा दाखल

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरव्या मिरच्यांचा माेठा व्यापारी असल्याचे भासवून विश्वास संपादन करून आडत विक्रेत्यांची तब्बल १३ लाख रुपयांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा करण्यात आला आहे.मार्केटमध्ये सतीश बन्सीलाल जैस्वाल (वय ४३) याचे बाजार समितीत आडत दुकान आहे. त्यांना प्रितेश प्रकाश लाेढा (प्रधान अपार्टमेंट फ्लॅट नं. १०, जळगाव) याने आपण हिरव्या मिरच्यांचा माेठा व्यापारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. सुरुवातीला हिरव्या मिरच्या स्वस्तात मिळवून देताे असे सांगून साडेतीन लाख रुपये मागितले.

ते जैस्वाल यांनी आरटीजीएसने दिलेत. त्यानंतर मिरचीला जादा भाव मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून पैसे द्या सांगून पुन्हा साडेतीन लाख रुपये घेतले; पण मिरची मालाचा पुरवठा केला नाही. तर पुन्हा काही दिवसांनी मिरचीला चेन्नईत चांगला भाव मिळताेय आपण तेथे पाठवू असे सांगून सहा लाख रुपये असे एकूण १३ लाख रुपये जैस्वाल यांच्याकडून १४ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२२ या काळात घेतले. हिरव्या मिरच्या न देता फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकाॅन्स्टेबल रवींद्र साेनार हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...