आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:काळी हळद देण्याच्या नावाखाली   फसवणूक; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरात सुख शांती आणि समृध्दी मिळवण्यासाठी काळी हळद देतो, असे सांगून भंडारा जिल्ह्यातील एकास तालुक्यातील वाडी खुर्द गावात बोलावले. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील दामोधर लक्ष्मण क्षीरसागर हे महाशिवरात्री निमित्त संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम यात्रेत आले होते. यात्रेत फिरत असताना एका महिलेच्या दुकानात आमच्याकडे काळी हळद आहे. ती घरात ठेवल्यावर सुख, समृध्दी होते व तुमच्या शत्रूचा नाश करते, असे क्षीरसागर यांना सांगितले. मात्र सध्या इथे हळद नाही. आणून ठेवली की आम्ही तुम्हाला फोन करू, असे महिलेने सांगितले. ३० मे रोजी दुपारी क्षीरसागर यांना यात्रेत भेटलेल्या त्या शीतल काळे नावाच्या महिलेचा फोन आला. आमच्याकडे काळी हळद उपलब्ध असून तुम्ही वाडी खुर्द येथे १ लाख रुपये घेऊन या, असे तिने सांगितले. तेव्हा ७० हजार रुपयांत त्यांचा सौदा ठरला. ठरल्याप्रमाणे ३१ मेच्या रात्री क्षीरसागर हे तीन मित्रांना घेवून वाडी येथे पोहोचले. यावेळी त्या ठिकाणी शीतल काळे, तिचा नवरा व साहिल आणि आनंद नावाची दोन मुले होती. महिलेने त्यांना काळ्या हळदीचा व्हिडिओ दाखवत पहिले पैसे द्या, नंतर तुम्हाला हळद देते, असे तिने सांगितले. त्यावेळी आधी हळद द्या, नंतर पैसे देतो असे क्षीरसागर म्हटले असता, त्या महिलेसह तिच्या दोन मुलांनी व नवऱ्याने क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून पैसे हिसकावून घेत पळ काढला.

बातम्या आणखी आहेत...