आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांचा नवा फंडा:हातचलाखीद्वारे ATM कार्ड बदलून 40 हजारांची फसवणूक

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर येथील बॅक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये गुरुवारी अनोळखी व्यक्तीने मुलाची दिशाभूल करून एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्या एटीएमच्या सहाय्याने 40 हजार रुपये रोख काढून फसवणूक केली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज रामदस आवारकर (रा.कौतिक नगर, जामनेर) हे त्यांच्या मुलासोबत जामनेरातील नवकार प्लाझा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा एटीएममधून पैसे काढत होता. त्यावेळी तेथे असलेल्या अनोळखी व्यक्तीने हातचलाखी केली. मुलाची दिशाभूल करून त्याच्याजवळील एटीएमची अदलाबदल केली. आवारकर यांच्या बदललेल्या एटीएमच्या सहाय्याने त्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये काढून घेतले.

पैसे काढल्याचा मेसेज

एटीएम अदलाबदल केल्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून गेला. त्यानंतर आवारकर यांना बँक खात्यातून 40 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्याबाबत त्यांनी मुलाला विचारणा केली. त्याने पैसे काढलेच नसल्याचे सांगितले. मुलाने एटीएमव्दारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएम दुसरेच असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने फसवणूक केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर आवारकर यांनी जामनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जयेंद्र पगारे हे करीत आहेत. एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. एटीएममधून पैसे काढताना कुणाला पासवर्ड सांगू नका, ज्येष्ठ नागरिकांनी पैसे काढता येत नसल्यास अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये. परिचित व्यक्तीला सोबत न्यावे,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...