आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हच्या बहाण्याने फसवणूक, शेतकऱ्याच्या बँक खात्यातून 99 हजार 862 रुपयांची परस्पर खरेदी

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्डसाठी कोणतीही मागणी केलेली नसताना एका भामट्याने शेतकऱ्याच्या घरी पोस्टाने कार्ड पाठवले. हे क्रेडीट कार्ड अॅक्टिव्ह करुन देण्याचा बहाणा केला. या फोनवर दिलेल्या माहितीनंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यातून ९९ हजार ८६२ रुपयांची परस्पर खरेदी करुन फसवणूक केली.

संजीव श्रीराम पाटील (वय ५३, रा. बलेसवाडी, ता. मुक्ताईनगर) यांची फसवणूक झाली आहे. पाटील यांनी क्रेडिट कार्डसाठी बँकेत मागणी केली नव्हती. तरी देखील ५ जानेवारी रोजी त्यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल व स्टेट बँकेचे असे संयुक्त क्रेडिट कार्ड आले. नंतर त्यांना मोबाइलवर अज्ञात व्यक्तींनी फोन करुन बँकेतून बोलत असल्याचे भासवले. पोस्टाने घरी आलेले क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने संजीव पाटील यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. एक ओटीपी पाटील यांना आल्यानंतर तो भामट्यांची विचारुन घेतला. ओटीपी देताच पाटील यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ८६२ रुपयांची परस्पर खरेदी केल्याचे मॅसेज प्राप्त झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्या दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...