आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालमत्तेची खाेट्या कागदपत्रांच्या मदतीने फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनाेद देशमुख, जिल्हा परिषद सदस्यांचे पती जितेंद्र उर्फ रवी बाबूराव देशमुख, अॅड. सुरेखा डी. पाटील, अॅड. सतीश चव्हाण यांच्यासह ११ जणांविरुद्ध रविवारी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनाेज लीलाधर वाणी (वय ४१, रा. जि.प. काॅलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी व त्यांची पत्नी कल्पना वाणी यांच्या नावावर राजेश घनश्याम पाटील यांना मृत्यूपत्राद्वारे मिळालेली पिंप्राळ्यातील मालमत्तेतील सामाईक प्लाॅट क्षेत्र ८६.६ चाैरस मीटर हे ३० लाख रुपयात ३.१०.२०१९ राेजी खरेदी केली आहे. ही जागा त्यांच्या नावावर असून, त्यात वाणी पती-पत्नी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे रामदास काॅलनीतील इमारत प्रती महिना १० हजार या प्रमाणे दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या मालमत्तेची रितसर नाेंदणीकृत खरेदी वाणी दाम्पत्याने राजेश पाटील यांच्याकडून करून घेतली आहे.
असा केला फसवणुकीचा प्रयत्न : दाेन्ही मालमत्तेची वाणी दाम्पत्यांची पक्की खरेदी असताना राजेश पाटील व त्याच्या अकरा सहकाऱ्यांनी संगनमत करून २०१७ मधील स्टॅम्पपेपर विकत घेऊन बनावट साैदा पावत्या करून त्या खऱ्या असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा गुन्हा जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.