आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सर्व धर्मियांसाठी मोफत सभागृह:जेपीपी संस्थेचा लोकहितार्थ उपक्रम; वृद्धाश्रमाचे लवकरच नियोजन करणार

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावखेडा शिवारात कोल्हे हिल्स परिसरात 13 हजार स्वेअरफूट जागेवर बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीसह 2 एकर खाजगी खुल्या भूखंडावरील जागेत सर्वधर्मियांना विविध धार्मीक विधी, सामाजिक उपक्रम निशुल्क राबविता येणार आहे. या सेवाकेंद्राचे शनिवारी लोकार्पण झाले. अहिंसा रिसर्च फाऊंडेशन संचलित जैन पार्श्व पद्मोदय ( जेपीपी) सेवाकेंद्र या जैन समाज संघटनेने या लोकोपयोगी कार्याची उभारणी केली आहे.

जैन समाजासह विविध धर्मियांमधील नागरिकांना सामाजिक लोकोपयोगी तसेच धार्मीक कार्यक्रम घेता यावे, यासाठी जैन समाज संघटनेनी या तीन मजली भवनाची निर्मीती केली आहे. विमलादेवी शंकरलाल कांकरिया यांच्या आर्थिक मदतीतून या सेवाकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

यांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण

ज्येष्ठ गुरू आचार्य प्रवर 1008 पू. पार्श्वचंद्र महाराज, डॉ.पदमचंद्र महाराज, जयेंद्रमुनी, जयशेखर मुनी, जयपुरंदरमुनी यांच्यासह समिणी प्रमुखा श्रीनिधी, श्रुती निधी या संताच्या उपस्थित सेवाकेंद्राचे लोकार्पण झाले. सकल जैन संघाचे अध्यक्ष दलीचंद जैन, जैन समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, राजेश जैन, अजय ललवानी, मनीष जैन, शंकलाल कांकरिया आदी उपस्थित होते.

काय आहे यात

इमारतीत भव्य सभागृहासह 500 नागरिकांसाठी भोजनगृह, वातानुकुलित सुविधेसह रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांसाठी प्रशस्त हॉल. किमान 50 रुग्णांवरउपचार घेता येईल असे नॅचरोपॅथी सेंटर उभारण्यात आले आहे. खुल्या जागेतही उद्यानाची निर्मीती सुरु आहे, यासह

वृद्धाश्रमाचे लवकरच नियोजन

जेपीपी सेवा केंद्र अध्यक्ष तेजस कावडीया म्हणाले की, सेवाकेंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे, शनिवारी संताच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. या केंद्रात सामाजिक, धार्मिक, आरोग्य सेवांविषयक उपक्रमांनाच निशुल्क जागा उपलब्ध करून दिली जाईल. फेब्रुवारीपर्यंत सर्व किरकोळ कामे पूर्ण होतील. लग्नसमारंभ व अन्य कामासाठी जागा दिली जाणार नाही. 50 व्यक्तींच्या निवासाची सोय होईल असे वृद्धाश्रमही उभारण्याचे नियोजन सुरु आहे. ते लवकरच पूर्णत्वास आणू.

बातम्या आणखी आहेत...