आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्लास्टिक कॅरीबॅगच्या निर्मूलनासाठी 300 कागदी पिशव्यांचे दररोज मोफत वाटप, दोन महिलांच्या हातांनाही मिळाले काम ; भाजीपाला विक्रेत्यांची झाली सोय

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानिकारक असून, प्लास्टिकमुक्तीबाबत जळगाव शहरात अभियान राबवण्यात येते आहे. अभियानाला हातभार म्हणून शहरातील मंगेश पुरुषोत्तम जुनागडे यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दररोज आठशे पिशव्या तयार करतात. त्यातून दररोज शहरात लहान व्यावसायिकांना ३०० पिशव्यांचे मोफत वाटप केले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना रोजगारही दिला आहे. रद्दीचे भाव २२ रुपये किलो... रद्दीचे भाव सध्या २२ रुपये प्रतिकिलो आहेत. एक किलो कागदापासून लहान आकाराच्या ३० तर मोठ्या आकाराच्या २० पिशव्या तयार होतात. लहान ३०० पिशव्यांना साडेसात किलो कागद लागतो. मोठ्या पिशव्यांसाठी हाच कागद १५ किलाे लागतो. चार महिन्यांपासून त्यांनी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या घरातील रद्दी विकून न टाकता त्यापासून लहान, मोठ्या आकाराच्या पिशव्या तयार करत आहे. शहरात जनजागृती व्हावी म्हणून दररोज ३०० विक्रेत्यांना पिशव्यांचे वाटप केले जाते आहे. राज्यभरात उपक्रम राबवण्याचा संकल्प प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा संकल्प आहे. ज्यांना कागदी पिशव्या तयार करण्याची व शिकण्याची इच्छा असेल त्यांना याबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. मंगेश जुनागडे, जळगाव गेल्या चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत अडीचशे किलो कागदापासून पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर पिशव्या या फुलविक्रेते, मेडिकल स्टोअर, अंडी विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार यांना वितरित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...