आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर‎:नेत्रज्योतीत आज मोफत आरोग्य; नेत्र तपासणी शिबिर‎

जळगाव‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत बाबा गुरदासराम चॅरिटेबल‎ ट्रस्टच्या नेत्रज्योती हॉस्पिटल, सिंधी‎ कॉलनी यांच्यातर्फे संत बाबा‎ गुरदासराम साहेब यांच्या ९१ व्या‎ जन्मोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी‎ ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत‎ मोफत आरोग्य तपासणीसह नेत्र‎ तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎ शिबिराचे आयोजन करण्यात आले‎ आहे. शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.‎ हिरा जोशी, डॉ. अल्विन राणे, डॉ.‎ शिरीष पाटील हे तपासणी करणार‎ असून, त्यात मोतीबिंदूसाठी‎ निवडलेल्या रुग्णांवर इंडियन लेन्स‎ टाकून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎ करण्यात येईल.

तसेच त्या रुग्णांची‎ आवश्यक रक्त तपासणी डॉ. तुषार‎ बोरोले यांच्या लॅबमध्ये मोफत‎ करण्यात येणार आहे. रेटिना‎ तपासणी डॉ. श्रुती चांडक यांच्या‎ मार्फत मोफत केली जाणार आहे.‎ शिबिराच्या ठिकाणी सकाळी ९.३०‎ ते ३ वाजेदरम्यान माधवराव‎ गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांचे‎ सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर‎ आयोजित करण्यात आले आहे. दंत‎ विभागात डॉ. पिंकी नाथानी, डॉ.‎ वर्षा रंगलानी व डॉ. सुप्रिया कुकरेजा‎ मोफत दंत तपासणी तर जनरल‎ तपासणी डॉ. मोहनलाल सध्रिया हे‎ करणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष‎ डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष‎ दिलीप मंधवणी, सेक्रेटरी डॉ.‎ मुलचंद उदासी यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...