आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:जळगावात संत बाबा गुरदासराम साहेब यांच्या 91 व्या जन्मोत्सवानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत बाबा गुरदासराम चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रज्योती हॉस्पिटल, सिंधी कॉलनी यांच्यातर्फे संत बाबा गुरदासराम साहेब यांच्या 91 व्या जन्मोत्सवानिमित्त बुधवार 15 जून रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार

शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ. हीरा जोशी, डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील हे तपासणी करणार असून, त्यात मोतीबिंदूसाठी निवडलेल्या रुग्णांवर इंडियन लेन्स टाकून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच त्या रुग्णांची आवश्यक रक्त तपासणी डॉ. तुषार बोरोले यांचे तुषार पॅथालॉजी लॅबच्या सहकार्याने रक्त तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे.

विविध आजारांची तपासणी

यासोबतच डोळ्याच्या मागील पडद्याचा रेटीना डॉ. श्रुती चांडक यांच्यामार्फत तपासण्यात येईल. दरम्यान शिबिरात सकाळी 9.30 ते 3 वाजेदरम्यान माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांचे सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दंत विभागात डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी व डॉ. सुप्रिया कुकरेजा मोफत दंत तपासणी करतील. तसेच ओरंगाबाद येथील मॅक्सीलो फेशियल सर्जन डॉ. दीपक मोटवानी यांच्यामार्फत डेंटल इम्प्लांटमध्ये विशेष सवलत देण्यात येईल. जनरल तपासणी डॉ. मोहनलाल सध्रिया हे करणार आहे. सर्व समाजातील नागरिकांनी रक्तदानात शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष दिलीप मंघवणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...