आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यातील महिलांना ईदपर्यंत दर शनिवार, रविवारी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कादरिया फाउंडेशनतर्फे सुरू झालेल्या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 290 महिलांनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनाचा फायदा घेतला आहे.
8 मार्च या महिला दिनापासून ते 22 मार्च या रमजान ईदपर्यंत दर शनिवार व रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान ईदगाह कॉम्प्लेक्स येथे महिलांना त्यांच्या अडचणींबाबत मोफत कायदेशीर सल्ला दिला जात असल्याचे कादरिया फाउंडेशनतर्फे कळविण्यात आले आहे.
महिलांनी घेतला लाभ
8 मार्चपासून आलेल्या शनिवार-रविवारच्या आठच दिवसांत तब्बल 302 महिलांनी आपल्यासाठी कौटुंबिक, मालमत्ता व इतर समस्यांसंदर्भात अॅड. दीपाली भावसार, अॅड. सलीम आय. शेख, फ़ारुब कादरी, मोहम्मद ज़ुबेर यांच्या टीमकडून आतापर्यंत 302 महिलांनी विविध प्रकारे सल्ला घेतल्याचे कादरी फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.
समस्यांवर कायदेशीर सल्ला
आज समाजात कौटुंबिक अत्याचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही, तसेच अपंग, निराधार, निरीक्षक अशा सर्व प्रकारच्या महिलांना कादरीया फाउंडेशनतर्फे मोफत मदतीचा हात देण्यात येतो. यात जिल्हा रुग्णालयाकडून अपंग सर्टिफिकेट, पती-पत्नीतील कौटुंबिक वादात कोर्ट व पोलिसांतील मदत, निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेत सहभागासाठी मदत, दारिदय रेषेखालील महिलांना मदत, व्यवसायासाठी कर्ज विषयक सल्ला, मालमत्तेसंदर्भात केसेसबाबत कायदेशीर सल्ला आदींबाबत फोनद्वारे वा प्रत्येक्ष भेटून सल्ला-मदत देण्यात फाउंडेशनच्या टीमतर्फे मदत देण्यात येत आहे.
नावही गुप्त ठेवण्यात येते
कौटुंबिक सल्ला घेण्यासाठी अनेक महिला नाव समोर येऊ नये यासाठी फोनवरून सल्ला घेतात. मात्र, आम्ही स्वत: त्यांना नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन दिल्यावर त्या प्रत्यक्ष भेटायला येतात. या महिलांना विश्वासात घेतल्यावर त्यांच्यावरील आपबिती समजल्यावर आम्ही देखील थक्क होतो. अशा महिलांना पोलिसांत तक्रारीपासून ते कायदेविषय लढाईपर्यंत आम्ही मोफत मदत करतो, असे अॅड. दीपाली भावसार यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.