आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात चढ-उतार:ख्रिसमसपासून थंडीचा जाेर वाढणार; पारा 13 अंशांवर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापमानात चढ-उतार सुरूच असून त्यामुळे थंडीची तीव्रताही कमी-अधिक हाेत आहे. येत्या रविवारपर्यंत तापमानात किंचित बदल कायम राहणार असून साेमवारपासून महिनाअखेरपर्यंत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शहरात बुधवारी १३ अंश सेल्सिअस नाेंदविले गेले.यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात तापमानात सर्वाधिक चढ-उतार झाले.

११ डिसेंबर राेजी किमान तापमान ११ अंशावर असतांना १२ डिसेंबर राेजी त्यात १० अंशाने वाढ हाेऊन तापमान २१ अंशापुढे गेले हाेते. याच वेळी दुपारचे तापमान देखील ३३ अंशावर गेल्याने दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री देखील उन्हाळ्याप्रमाणे उकाडा जाणवत हाेता. आठवडाभर हीच स्थिती कायम असतांना १७ डिसेंबर राेजी तापमान पुन्हा खाली येऊन १७ अंशावर आले आहे.

त्यानंतर २१ डिसेंबरला किमान तापमान १३ अंशाच्या निचांकावर आहे. तापमानात माेठ्या प्रमाणावर चढउतार हाेत असतांना वाऱ्याचा वेग, हवेतील आर्द्रता, ढगाळ स्थिती याबाबी वातावरणावर परिणाम करणाऱ्या ठरत आहेत. पुढील तीन दिवस तापमानात एक ते दाेन अंशाचा चढउतार कायम राहील. रविवारी ख्रिसमस असून त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार आहे.

२५ ते ३१ डिसेंबरदरम्यान जाणवणार हुडहुडी
पुढील आठवड्यात किमान तापमानात घट हाेऊन थंडीची तीव्रता वाढेल. साेबतच दाट धुकेही पडण्याचा अंदाज आहे. २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान उत्तरेतून गार वारे वाहण्याची शक्यता असल्याने त्याचा प्रभाव म्हणून उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता अधिक असेल.

बातम्या आणखी आहेत...