आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवाबनवी:25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेस तीन लाखांचा गंडा, भामट्यांना पैसे देण्यासाठी महिलेने बकऱ्या, कोंबड्याही विकल्या

प्रतिनिधी | जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोची २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असून, रक्कम मिळवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून २ लाख ९२ हजार ७०९ रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्यांना पैसे देण्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांनी बकऱ्या, कोंबड्याही विकल्या आहेत. शबानाबानो शेख सादिक (वय ४०, रा. खाटीकवाडा, रांजणगाव, ता. चाळीसगाव) या महिलेची फसवणूक झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शबानाबानो यांना ८ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. ‘तुम्हाला कौन बनेंगा करोडपती या शोची २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, ही रक्कम मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स, इतर चार्जेस लागणार आहेत’ असे भामट्याने सांगितले.

शबानाबानो यांना विश्वासात घेतल्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत त्यांना आकाश वर्मा, मनोज सिंग, प्रदीप कुमार रवानी, संदीप कुमार, अनुप्रिया कुमारी, अंकित पाल, गौरव आर्यन कुमार असे नाव संागणाऱ्या तरुणांचे फाेन आले. या सर्वांनी शबानाबानो यांना लॉटरीच्या रकमेबद्दल आमिष दिले. वेगवेगळी कारणे सांगून पाच वेळा करून त्यांच्याकडून २ लाख ९२ हजार ७०९ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले.

पैसे भरल्यानंतर शबानाबानो यांनी संबंधितांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आाहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

उदरनिर्वाहाचे साधनही शिल्लक राहिलेले नाही

शेख कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. बकऱ्या, कोंबड्या पाळून, मजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशात २५ लाख रुपयांची लॉटरी मिळवण्याच्या नादात ते आमिषांना बळी पडले. भामट्यांना पैसे देण्यासाठी शेख कुटुंबीयांनी घरातील बकऱ्या, कोंबड्याही विकल्या. आता त्याच्याकडे उदरनिर्वाहाचे साधनही शिल्लक राहिलेले नाही.

या सर्वांनी शबानाबानो यांना लॉटरीच्या रकमेबद्दल आमिष दिले. वेगवेगळी कारणे सांगून पाच वेळा करून त्यांच्याकडून २ लाख ९२ हजार ७०९ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले. पैसे भरल्यानंतर शबानाबानो यांनी संबंधितांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आाहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...