आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 टक्के वाढीचा शॉक बसणार:इंधन समायोजन शुल्क ग्राहकांच्या मानगुटीवर

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व वीज ग्राहकांना जुलै महिन्याच्या बिलापासून पुढील ५ महिन्यांसाठी इंधन समायोजन आकाराचा २० टक्के वाढीचा शॉक बसणार आहे. या दरवाढी विरोधात राज्य वीज ग्राहक संघटनेतर्फे ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान जिल्हा व तालुकास्तरावर जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

वीज ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या बिलापासून ५ महिन्यासाठी अदानी (इंधन) समायोजन आकार या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. महावितरण कंपनी आता वीज ग्राहक संघटना याबाबत आवाज उठवून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...