आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी:काेराेनात मृत्यू झालेल्या सभासदांना संपूर्ण कर्जमाफी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे ४९६ सभासद मृत झालेले आहेत. अशा सभासदांना १०० टक्के कर्जमाफी तसेच सर्व सभासदांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी संस्थेच्या वार्षिक अहवालात ३ हजार २२० रुपये सभासद निधीतून कपात करण्याची पोटनियमात दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. संचालक मंडळाने सभासद कल्याण निधीच्या रकमेत दुरुस्ती करून ३ हजार २२० ऐवजी २ हजार ४० रुपये इतकी सुधारित कपात करून केवळ ७२० रुपयांप्रमाणे वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे.

ग.स. सभासद कल्याण निधी या योजनंेतर्गत कर्ज नसलेल्या सभासदांचा मृत्यू झालेला आहे. अशा सभासदांच्या कुटुंबीयांना कुटुंब सहाय्य निधी ५० हजार रुपये, जामीन कर्ज मुक्ती फंड ५० हजार रुपये तसेच विशेष कर्जमुक्ती फंड ५० हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. चाळीसगाव, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आजामीन कर्ज, मुक्ती फंड, मृत सभासद विशेष कर्ज मुक्ती फंड, राष्ट्रमाता जिजाऊ कन्यादान याेजना, ज्येष्ठ सभासद सन्मान योजना, ग.स. प्रबोधिनी निधीसाठी सभासदांची २ हजार ४० रुपये वार्षिक रक्कम कपात करण्यात येणार आहे. जून, सप्टेंबर, डिसंेबर व मार्च या कालावधीत ही रक्कम कपात करण्यात येईल. सभासदत्वाची २५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना ५००१ व ३० वर्षे ७ हजार ५०१ रुपये भेट देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...