आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Funding Of Rs. 19 Crore From DPC For 168 Anganwadas, 'Bala' Will Be An Innovative Initiative; Construction Will Be Completed By March 2023 | Marathi News

दूर होणार अडचण:168 अंगणवाड्यांसाठी 19 कोटींचा डीपीसीमधून निधी, ‘बाला’ हा अभिनव उपक्रम राबवणार; 2023 मार्चपर्यंत होणार बांधकाम पूर्ण

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १६८ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत १९ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बिल्डिंग एज लर्निंग एड (बाला) या योजने अंतर्गत हा निधी असून अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारल्या जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा निधी मंजूर केला आहे.

गेल्या ३ महिन्यांपूर्वी १०८ अंगणवाड्यांसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बाला या अभिनव उपक्रमानुसार एका अंगणवाडीच्या इमारतीसाठी ११ लाख २५ हजार या प्रमाणे १६८ प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. यातील ८ लाख ५० हजार रूपये अंगणवाडीच्या बांधकामासाठी तर २ लाख ७५ हजार रूपये बाला उपक्रमासाठी प्रदान करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ १६ कोटी ८० लक्ष निधी जि. प. कडे वितरित केला असल्याने जिल्ह्यात बाला या अभिनव उपक्रमाप्रमाणे आधुनिक पद्धतीने अंगणवाडी बांधकाम होणार असल्याने बालकांना मोठा फायदा होणार आहे. या मंजूर अंगणवाड्याचे बांधकाम मुदतीत व दर्जेदार पद्धतीने बांधकाम करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे बालकांसह सेविकांची अडचण दूर होणार आहे.

अशा आहेत तालुकानिहाय अंगणवाड्याची संख्या
अमळनेर (८), भडगाव (१०), भुसावळ (५), चाळीसगाव (१५), चोपडा (१५), धरणगाव (९), एरंडोल (९), जळगाव (११), जामनेर (१८), मुक्ताईनगर (१३), पाचोरा (२०), पारोळा (१५), रावेर (१०) यावल (१०) अशा १६८ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालकांना शैक्षणिक दृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे. मार्च २०२३ पर्यंत या अंगणवाड्याचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे.

आकर्षक चित्रांचे थ्रीडी प्रकारातील रेखाटन करणार
सुटसुटीत बांधकाम, सेप्टीक टॅकसह शौचाल. स्वतंत्र प्रसाधनगृह, हॅडवॉश सेंटर, स्वतंत्र किचन, सामानासाठी कपाट, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, झाडू खराटा, कपाटे, फळे, फुले, कार्टून व आकर्षक चित्रांचे थ्रीडी प्रकारातील रेखाटन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...