आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘गण गण गणात बोते ’ जय गजानन या नावाचा जयजयकार करीत 65 पुरूष यात्रेकरूंसह 10 महिला व 12 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेली सायकल वारी मंगळवारी सकाळी 11.00 वाजता शहरातून तीर्थक्षेत्र शेगावकडे रवाना झाली. शहरातील आकाशवाणी चौकात या वारीचे स्वागत करण्यात आले. सहभागी महिलाही दररोज 100 ते 120 किलोमीटरचा प्रवास करीत असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.
संत गजानन महाराज भक्त मंडळ नाशिक येथील ही वारी रविवारी मार्गस्थ झाली होती. वारीचे हे 23 वे वर्ष आहे. मंडळाचे सदस्य प्रल्हाद भांड यांनी ही सायकल वारीची सुरुवात केली होती. सुरवातीला ते एकटे प्रवास करीत होते, हळूहळू भाविकांची संख्या वाढली आहे, यावर्षी 75 वारकरी यात सहभागी झाले. ही सायकल वारी केवळ पुरूषांपुरता मर्यादित न राहता यात महिलांनीही आपले आस्तित्व सिद्ध केले आहे. आकाशवाणी चौकात सार्वजनिक बांधकाम अभियंता आनंद सोलट व गजानन सेवकांनी वारकरींचे स्वागत केले.
महिलांसाठी मुक्कामात स्वतंत्र व्यवस्था
गजानन परिवारातील महिला वारकरींसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. वारी सोबत वैदकीय व्यवस्थाही असून ट्रॅकमध्ये सामानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्या महिलेस थकवा, अथवा त्रास जाणवल्यास वैदकीय पथकही कार्यरत आहे. मुंबई, ठाणे, अहमदनगर, कल्याण येथूनही सायकलस्वार यात सहभागी असल्याचे वारकऱ्यंानी सांगितले.
सायकल चालवा पर्यावरण वाचवाचा संदेश
460 किलोमीटरचे हे अंतर चार दिवसात पार पाडले जाणार आहे. मालेगाव, पारोळा नंतर मंगळवारी मुक्ताईनगरात मुक्काम झाला. बुधवारी सायंकाळी ही सायकलवारी शेगावला पोहचेल. सायकलपटूंसाठी चहा, पाणी, भोजन व मुक्कामाची व्यवस्था ही मार्गावरील गावांमधील गजानन सेवक करतात. मार्गावर काही गावांमध्ये थांबून पर्यावरणाचे महत्व पटवून देत जनजागृती करण्यासह वृक्षारोपणही वारकरी करतात असे अनुजा कुचेकर यांनी सांगितले. वारीत सीताराम भांड, नारायण सुतार, सुधाकर सोनवणे, पुण्यश्री भांड, श्रद्धा बुब, अरुण शिंदे आदी सहभागी झाले आहेत.
गजानन महाराजांच्या कृपने कुठेलही संकट वारीत येत नाही. दोन महिन्यांपासून सायकलचीचा सराव सुरू होता. महिलाही सायकल चालवित उत्सफूर्ते सहभागी झाल्या आहेत. रात्री भजन, गवळण आदी कार्यक्रम होतात. बुधवारी सायंकाळी ही रॅली शेगावात पोहचले. पुढील वर्षी शंभराहून अधिक भाविक सहभागी होतील.
- राजेंद्र भांड, अध्यक्ष सायकल वारी यात्रा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.