आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफल रंगली:गंधारतर्फे पाठाेपाठच्या बहिणी कार्यक्रम रंगला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंधार कला मंडळातर्फे बुधवारी अक्षरगप्पांची मैफल रंगली. त्यात संगीतकार मीना खडीकर व गायिका आशा भाेसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘पाठाेपाठच्या बहिणी’ हा कार्यक्रम घेण्यात आला. एकाहून एक सरस गीते सादर करून कलावंतांनी लक्ष वेधून घेतले.‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘खोडी माझी काढाल तर’, ‘कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा’, ‘सांग सांग भोलानाथ अशी लोकप्रिय बालगीते अजूनही लहान थोर आवडीने ऐकतात व गातात. अशा गीतांच्या संगीतकार मीना खडीकर यांचा वाढदिवस बुधवारी तर नटखट, भारदस्त, शृंगारिक, वैविध्यपूर्ण, गोड गळ्याच्या गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस ८ सप्टेंबर हा असताे.

गायिका, संगीतकार मीना खडीकर व आपल्या चिरतरुण आवाजाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या आशा भोसले या दीनानाथांच्या दोन्ही कन्या. दोघींचे जन्म वर्ष वेगळे असले तरी मीना खडीकर या मोठ्या. त्यांचा वाढदिवस गंधार कला मंडळातर्फे अक्षरगप्पांमधून त्यांच्या संगीत कारकीर्दीला उजाळा देऊन साजरा करण्यात आला. सुरुवातीला आरती दीक्षित यांनी खडीकर यांच्या जीवनप्रवासाची माहिती दिली. त्यांनी संगीतबद्ध केलेले गाणी लता मंगेशकर, उषा मंगेशकर, श्रीकांत पारगावकर यांनी गायली असून सुरेश वाडकर यांनी गायलेल्या एका गाण्याला राज्य सरकारचा पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची बालगीते पालवी मांडे व कृष्णाई महाले यांनी सादर केली. आशा भोसले यांच्या मराठी गीतांचा आढावा सुचेता नेवे यांनी घेतला.

आशा भाेसले दैवी शक्ती : विशाखा देशमुख
आशा भाेसले यांची सांज ये गोकुळी, रुपेरी वाळूत, ये राते ये मौसम, ओ हसीना जुल्फो वाली, जय शारदे अशी गाणी सोनी जोगी, वरदा देशमुख, नीलकंठ कासार यांनी गायली. शैला नेवे, इंदिरा जाधव, आसावरी जोशी यांनी आठवणी कथन केल्या. आशा भोसले यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येऊनही धैर्याने त्या पुढे जात नवे उच्चांक प्रस्थापित करीत होत्या. संगीतातील चमत्कार आणि दैवी शक्ती म्हणजे आशा भोसले असे निवेदनातून विशाखा देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाला विलास देशमुख, मानिनी तपकिरे, रती कुलकर्णी, गोविंदराव बावने, भास्करराव चव्हाण, संतोष मराठे यांच्यासह रसिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...