आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा उत्साह नजरेत भरणारा:गेल्या वर्षापेक्षा यंदा साडेपाच तास लांबले गणेश विसर्जन

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वर्षांच्या खंडानंतर प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आलेल्या गणेशाेत्सवाचा समाराेप शुक्रवारी गणरायाच्या विसर्जनाने झाला. काेराेनामुळे अत्यंत साधेपणाने झालेल्या विसर्जनाच्या तुलनेत यंदाचा उत्साह नजरेत भरणारा ठरला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विसर्जन तब्बल साडेपाच तास लांबले.

पाच फुटांपेक्षा माेठ्या १ हजार ३६८ तर ४२ हजार घरगुती गणेशमूर्तींचे मेहरूण तलावात विसर्जन करण्यात आले. शनिवारी सकाळी ७.३० वाजता सर्वात शेवटच्या गणरायाला निराेप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत दाेन लाखांपेक्षा जास्त भाविक सहभागी झाले.

तब्बल दाेन लाख भाविकांचा सहभाग
मेहरूण तलावाचे दाेन लाख भाविक उपस्थि हाेते. मनपा, पाेलिस व धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ६०० जणांनी विसर्जनासाठी प्रयत्न केले. यात सुमारे १३ टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे आराेग्य विभागाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...