आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव:वाईट परिस्थितीतही चांगले काम कसे करता येईल हे गणेशाेत्सव शिकवताे

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेशोत्सव अर्थव्यवस्था प्रवाहित करण्याचे काम करताे, वाईट परिस्थितीतही चांगले कसे काम करता येईल हे उत्सव शिकवताे. तसेच सर्वसामान्यांचा उत्सव तर यंत्रणेचा ताण असे उत्सवाचे स्वरूप न आणता सर्वसमावेशक उत्सव होणे काळाची गरज असल्याचा सूर मंगळवारी ‘सार्वजनिक गणेशोत्सव : नवी आव्हाने, नवी जबाबदारी’ या परिसंवादात उमटला.

रोटरी जळगाव रॉयल्स, रोटरी जळगाव स्टार्स व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दुपारी ५ वाजता मायादेवी मंदिरातील रोटरी हॉल येथे ‘सार्वजनिक गणेशोत्सव : नवी आव्हाने, नवी जबाबदारी’ हा परिसंवाद झाला. यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सचिन नारळे, राेटरीचे सह प्रांतपाल दिलीप गांधी, डॉ. शमा सुबोध, ज्ञानेश्वर बढे, विजय लाठी, सागर मुंदडा यांनी यांनी सहभाग घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

परिसंवादात मान्यवरांनी उत्सवाचे स्वरूप हे खंडणीचे नसावे, उत्सवात गुलाल नसावा येथपासून ते पीओपी, शाडूमाती या सर्वच मूर्तींचे रिसायकलिंग होण्याची गरज व्यक्त केली. याच पद्धतीने उत्सवात नागरिकांप्रमाणेच महिलांचाही सहभाग तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असावा. जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने सामाजिक संघटनांच्या बरोबरीने काम करावे. विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्याचा वापर करावा. उत्सव काळात मद्याचे सेवन करू नये. मंडळाच्या परिसरात लहान व्यावसायिकांना जागा देऊन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्यास मदत करावी, असे मत देखील व्यक्त केले. मनीष पाथ्रीकर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमात यांचा सन्मान
सार्वजनिक गणेश महामंडळाच्या कार्याला २७ वर्षे झाली आहे. तेव्हापासून शरीफ पिंजारी हे महामंडळासोबत आहे; मात्र ते कधीच समोर आले नाहीत. त्यांच्या गौरव करण्यात आला. पोलिस कर्मचारी अमित माळी यांचादेखील गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...