आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार:4 लाख रुपयांच्या गांजासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक; नंदुरबार एलसीबीची कारवाई

नंदुरबारएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना काल गुप्त बातमीदारामार्फत रात्री धडगांव येथून अमली पदार्थ सुका गांजाची वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीने सापळा रचून कारवाई केली आणि लाडे नऊ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल(दि. 22) रात्री शहादा तालुक्यातील दरा फाट्यावर पोलिस वाहनांचे निरीक्षण करत थांबले होते. यावेळी रात्री 08.30 वाजेच्या सुमारास धडगांव गावाकडून महिंद्रा गाडी वेगाने येतांना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वाहन उभे करण्याचा इशारा दिला. यावेळी संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने गाडी पुढे नेली. यावेळी पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन गाडीला थांबवले आणि त्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोप्या डेमच्या पावरा (वय-25 रा. पिंप्री तालुका धडगांव)०००० आणि विनोद भगवान चव्हाण (वय-21 रा. वडफळ्या तालुका धडगांव) असे आरोपींची नावे आहेत.

दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यात प्लास्टीकच्या गोणीत 4 लाख 27 हजार 945 रुपये किमतीचा 61 किलो 135 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा आढळून आला. तसेच, 5 लाख रुपये किमंतीची एक महिंद्रा मॅक्स कंपनीचे वाहन (क्रमांक MH-39/0913) असा एकुण 9 लाख 27 हजार 945 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...