आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफैजपूर महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या संकल्पनेतून समरसता महाकुंभात लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. या महाकुंभानंतर परिसरात उभारण्यात आलेला सभामंडप, ब्रह्मभोजन मंडप व पार्किंगची सुविधा आदी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आलेले मंडप काढून तेथील परिसराची १५० स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. महाकुंभात महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील भाविकांचीदेखील उपस्थिती होती. गुजरात राज्यातून ३० लक्झरी बसेस आणि चारचाकी वाहने, रेल्वेद्वारे भाविक समारंभात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, समरसता महाकुंभ हा इतिहासाचा साक्षीदार होणार अाहे. निसर्ग, नियती व प्रकृती आपल्यासोबत असल्याने, कोणतीही अडचण आली नाही. संतमहात्म्यांनी आपली प्रशंसा केली. व्यवस्थापन व समितीचे कौतुक केले.
तरूणांचे मोठ्या प्रमाणात संघटन होऊन त्यांच्या हातून देश, धर्माचे कार्य झाले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राज्या- राज्यात याच महाकुंभाची महिलांचा साडीचोळी देऊन केला सन्मान सुमारे दीडशे स्त्री-पुरुष स्वयंसेवकांनी परिसरातील कचरा, फुलमाळा, प्लास्टिक, कागद, कॅरिबॅग व अन्य निरूपयोगी वस्तू एकत्र करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. भुसावळ येथील नगरसेवक निर्मल कोठारी यांनी वढोदे येथे सुरूवातीपासून स्वेच्छेने काम करत असलेल्या २० महिलांना साडीचोळी भेट दिली. महाकुंभात संतांची शंभर टक्के उपस्थिती, शिस्त, शांतता, नियोजन, भक्ती, श्रध्दा यांचा समरस होऊन हा महाकुंभ यशस्वी झाला.
वढोदा येथील निष्कलंकधाम परिसरात स्वच्छता करताना स्वयंसेवक. चर्चा आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी महाकुंभासाठी स्वयंप्रेरणेने शेती उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांच्या शेतीत जमा झालेला कचरा तसेच प्लास्टिक व इतर वस्तू जमा करून स्वच्छता मोहीम दि. ५ रोजी दुपारी राबवण्यात आली. जमा झालेला कचरा खड्ड्यात पुरणार असून कुठेही नदी, नाले या ठिकाणी फेकला जाणार नाही. त्यामुळे प्रदूषण टळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.