आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेलऐवजी एलपीजी या इंधनाला पर्याय म्हणून सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील १५ हजारांवर रिक्षांना एलपीजी किटची सक्ती करण्यात आली आहे; परंतु अधिकृत एलपीजी पंपाऐवजी ‘जुगाड’च्या माध्यमातून घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून देणारे शहरात १५ ते २० अवैध केंद्र कार्यान्वित झाले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सध्याच्या ४३ अंश तापमानात प्रत्येक एका किलोमीटर अंतरावर असलेले हे अवैध रिफिलिंग केंद्र जणू गॅस बॉम्ब ठरू पाहत आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण राेखण्याच्या शासनाच्या धोरणामुळे एलपीजी गॅसचा पर्याय समोर आला. जळगाव शहरात एक आणि नशिराबाद येथे एक असे दाेन एलपीजी गॅस पंप कार्यान्वित आहेत. त्याला समांतर पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांत शहरातील प्रत्येक भागात वर्दळींच्या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटारच्या सहाय्याने थेट वाहनांना प्रामुख्याने रिक्षांमध्ये गॅस भरून देणारे केंद्र कार्यान्वित झाले आहे.
पोलिसांची किरकोळ कारवाई....
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा पुरवठा विभागाची आहे. या विभागाने अशी काही कारवाई केल्याचे गेल्या काही महिन्यात समोर आलेले नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस विभागानेही त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दीड महिन्यांपूर्वी शहर पोलिसांनी शिवाजी नगरातील केंद्रावर कारवाई करून सिलिंडर पोलिस ठाण्यात आणून जप्त केले होते. त्या केंद्रावर पुन्हा गॅस फिलिंग सुरू आहे. जिल्हापेठ पोलिसांनी दाेन महिन्यांपूर्वी आकाशवाणी चौकातील चहा विक्रेत्यावर घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर या कलमान्वये कारवाई केली हाेती. प्रत्यक्षात जिल्हापेठ हद्दीत थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते असा अवैध वापर करत आहेत. हंडी उलटी ठेवून भरला जातो गॅस.... वाहनात घरगुती गॅस भरण्यासाठीच्या केंद्रासाठी एक पत्र्याची टपरी ज्यात वजनकाटा, गॅस हंड्या, इलेक्ट्रिक मोटार, गॅस वाहून नेण्यासाठी नळ्या एवढेच साहित्य लागते. गॅसहंडी थेट वजनकाट्यावर ठेवून त्याला इलेक्ट्रिक मोटारीची नळी जाेडली जाते. त्याद्वारे प्रेशरने हा वायू अधिक द्रव स्थितीतील गॅस वाहनाच्या टँकमध्ये भरला जातो.
मुळात गॅसहंडीचा वापर हा उभी ठेवूनच करणे आवश्यक असताना ती उलटी करून कोणत्याही शास्त्राेक्तपणे प्रमाणित नसलेल्या उपकरणाच्या मदतीने हा गॅस भरला जातो आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका आहे. गॅस पंपावर दिवसाला १०० तर अवैध केंद्रावर तासाभराची वाहनांची असते वेटिंग हजाराेंच्या संख्येने रिक्षांची संख्या असल्याने सुरुवातीला दिवसाला चार हजार लिटरपर्यंत गॅस खपत असलेल्या या पंपावर आता दिवसाला अवघे १०० लिटर एलपीजी गॅसची विक्री हाेत आहे. तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीतील अजिंठा चौफुलीवर असलेल्या तीनपैकी दाेन केंद्रांवर तासभर वाहन (रिक्षा) गॅस भरण्यासाठी थांबून असल्याचे दिसून येते.
एलपीजी गॅस भरण्याची पद्धती शास्त्रोक्त व प्रमाणित नसल्यास गॅस खुल्या वातावरणात बाहेर आल्यास त्याचा वातावरणातील ऑक्सिजनशी संयाेग हाेईल. त्यामुळे ज्वलनशील हाेऊन पेट घेण्याची शक्यता अधिक निर्माण हाेते. त्याचबराेबर सध्याच्या ४० ते ४४ अंश तापमानात हा धोका कैक पटींनी वाढू शकतो, असे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केमिकल सायन्स विभागाच्या प्राध्यापकांनी सांगितले.
शहरात या ठिकाणी सुरू आहेत अवैध गॅस रिफिलिंग सेंटर
शिवाजीनगर : मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानापासून ५० पावलावर, शनिपेठ : मनपाची गंगूबाई शाळे शेजारील गल्लीत, काट्याफाइल : वखारी शेजारील गल्लीत, जैनाबाद रस्ता : पुलाच्या शेजारील गल्लीत विशेष म्हणजे हे दाेन्ही केंद्र हे शनिपेठ पोलिस ठाण्याच्या रस्त्यावर आहेत.
न्यू बीजे मार्केट : भंगार बाजारात, नेरी नाका : स्मशान भूमीसमोर, पिंप्राळा-हुडकाे रस्त्यावर, हरिविठ्ठल नगर, राजीव गांधी नगर, मेहरूण : संतोषी माता मंदिर गल्ली, शेरा चौक, तांबापुरा परिसर : मेहरूणकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रामानंदनगर : श्री हाॅस्पिटल समोरील मोकळ्या जागेत, मूजे महाविद्यालया मागे : लक्ष्मीनगरात, भूषण काॅलनीत, अजिंठा चौफुली : या ठिकाणी तीन केंद्र सुरू असून, त्यातील दाेन केंद्रावर एकाच वेळी २० रिक्षा वेटिंगवर उभ्या असतात. शिवाजीनगर : मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानापासून ५० पावलावर, शनिपेठ : मनपाची गंगूबाई शाळे शेजारील गल्लीत, काट्याफाइल : वखारी शेजारील गल्लीत, जैनाबाद रस्ता : पुलाच्या शेजारील गल्लीत विशेष म्हणजे हे दाेन्ही केंद्र हे शनिपेठ पोलिस ठाण्याच्या रस्त्यावर आहेत. न्यू बीजे मार्केट : भंगार बाजारात, नेरी नाका : स्मशान भूमीसमोर, पिंप्राळा-हुडको रस्त्यावर, हरिविठ्ठल नगर, राजीव गांधी नगर, मेहरूण : संतोषी माता मंदिर गल्ली, शेरा चौक, तांबापुरा परिसर : मेहरूणकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रामानंदनगर : श्री हाॅस्पिटल समोरील मोकळ्या जागेत, मूजे महाविद्यालया मागे : लक्ष्मीनगरात, भूषण काॅलनीत, अजिंठा चौफुली : या ठिकाणी तीन केंद्र सुरू असून, त्यातील दाेन केंद्रावर एकाच वेळी २० रिक्षा वेटिंगवर उभ्या असतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.