आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गावरान बाेरं बाजारात पण अवकाळी पावसासह वातावरणीय बदलाने मेहरूणच्या बाेरांची प्रतीक्षा

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येणाऱ्या मेहरूणच्या बोरांचा रानमेवा अद्याप बाजारात पोहाेचला नाही. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा बहार येण्यास उशीर झाल्याने मेहरूणची बाेरे आली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात गावरान बारीक बोरं आली असली तरी खवय्यांना मेहरूणच्या बोरांची प्रतीक्षा आहे.

मेहरूणच्या बोरांचा गोडवा राज्यभर लोकांच्या जिभेवर आहे. त्यामुळे थंडीत गाजर, वांगे, याचबरोबर बोरं हे समीकरण मानले जाते. पुणे, मुंबई, नाशिकसह विविध प्रांतात जाणारी मंडळी हा रानमेनवा घेऊन गेल्याशिवाय राहत नाहीत. नोव्हेंबरमध्ये येणारी मेहरूणची बोरं अजून स्थानिक बाजार समितीत आली नसल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले.

डिसेंबरात आवक वाढणार
बोरांचा बहार पूर्णपणे आलेला नाही. थंडी वाढल्याने आता पुढील आठवड्यापर्यंत चांगल्या प्रकारे बोर पिकतील. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात बोरांची आवक वाढून ते बाजारापर्यंत पोहाेचतील. पंढरीनाथ कोल्हे, बोर उत्पादक

अॅपल रसाळ बोरांना पसंती, तेजीचे मिळताहेत संकेत
चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट या बोरांची प्रामुख्याने ओळख असून ‘ॲपल बोर’ बाजारात स्थान मिळवू लागली आहे. या बोरात गर अधिक असल्याने त्यांना पसंती मिळते. २० ते ४० रुपये प्रमाणे या बोरांना भाव आहे. सोलापूर, बारामती भागातून या बोरांची आवक होते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा या बोरांचा हंगाम असतो. हंगामाची सुरुवात असल्याने त्याचे भाव तेजीत राहतील. डिसेंबर महिन्यानंतर त्याची आवक वाढेल.

बातम्या आणखी आहेत...