आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभा:महापालिकेची महासभा बुधवारी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दीड महिन्याच्या खंडानंतर येत्या २१ डिसेंबर राेजी महापालिकेची महासभा हाेईल. या सभेत ३५ प्रस्तावांवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यात प्रशासकीय व अशासकीय प्रस्तावांचा समावेश आहे. महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात हाेईल.

विषय पत्रिकेवर मनपाच्या प्रभाग समिती एक ते चार हद्दीतील नव्याने तयार मिळकतींचे मालमत्ता कराचे मूल्यांकन करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मान्यता देणे, बालगंधर्व नाट्यगृह, सागर पार्क मैदान, मनपा उद्यान, खुल्या जागा या तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव आहे.

बातम्या आणखी आहेत...