आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या:जनरल नॉलेजचा पेपर 26 जून ऐवजी 4 जुलैला होणार, बी.कॉम द्वितीय वर्षाच्या वेळापत्रकात बदल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाच्या परीक्षांना 14 जूनपासून सुरवात होत असून एस.वाय बी.कॉम सत्र 4 चा सामान्यज्ञान या विषयाचा 26 जून रोजी होणार पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. या दिवशी सीएची परीक्षा असल्याने आता हा पेपर 4 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा पाहून हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आले. 26 जून रोजे एस.वाय बी.कॉमचा सत्र 4 चा जनरल नॉलेज विषयाचा पेपर घेण्यात येणार होता.

मात्र, याच दिवशी चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया यांनी सीए फाउंडेशन कोर्सची परीक्षा दुपारी 2 वाजता आयोजित केली आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर पुढे ढकलावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनी केली होती. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला नसून इतर अभ्यासक्रमांची 26 जून रोजी होणारी परीक्षा वेळापत्रकानुसार होईल, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...