आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेप्रवाशांसाठी महत्वाची बातमी:भुसावळ विभागातून 167 गाड्यांसाठी सुरू होणार जनरल टिकिटाची सुविधा

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ विभागातून जाणाऱ्या 167 गाड्यांसाठी 29 जूनच्या मध्यरात्रीपासून जनरल तिकीट सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या जनरल टिकिटाची सुविधा सुरू होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनापूर्वी जेवढ्या एक्सप्रे गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा होती तेवढ्या सर्वच गाड्यांमधून प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे.

भुसावळ विभागातून धावणाऱ्या 167 गाड्यांसाठी जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच पासधारकांनादेखील सुविधा देण्यात आली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाकडून ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नागरिकांना सवलतीत प्रवास करता येणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमधून आनंदाचे वातावरण आहे.

या एक्स्प्रेसना जनरल तिकिटची सुविधा

पवन एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस, काशी एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, कामायनी एक्सप्रेस आदी भुसावळ विभागातून धावणाऱ्या पण जळगावला थांबा असणाऱ्या सर्व गाड्यांना जनरल तिकीट मिळणार आहे.

राजधानीसह एसी गाड्यांना सुविधा नाही

संपूर्ण एसी गाड्यांना व राजधानी एक्स्प्रेस या गाडीला जनरल तिकीटची सुविधा राहणार नाही. इतर सर्वच एक्स्प्रेस गाड्यांना जनरल तिकीटची सुविधा देण्यात आली आहे. कोरोनापूर्वी जेवढ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवासी जनरल तिकिटाने प्रवास करत होते. तेवढ्या सर्वच एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवाशांना जनरल तिकिटातून प्रवास करता येणार आहे.

29 जूनच्या मध्यरात्रीपासून सुविधा

29 जूनच्या मध्य रात्रीपासून जनरल तिकिटाची सुविधा सुरू होत आहे. रेल्वे बोर्डाकडून इतर सवलतधारकांसह ज्येष्ठनागरिकांसाठी असणाऱ्या सुविधेबाबत तूर्त आदेश नाहीत. - बी. अरुणकुमार, डीसीएम

बातम्या आणखी आहेत...