आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:167 रेल्वे गाड्यांना 29 जूनपासून जनरल तिकीट; मासिक पासधारकांसाठी आता ही सुविधा मिळणार

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जाणाऱ्या १६७ गाड्यांसाठी २९ जूनच्या मध्यरात्रीपासून जनरल तिकीट सुरू करण्यात येणार आहे. कोरोनापूर्वी जेवढ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा होती तेवढ्या सर्वच गाड्यांमधून प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या १६७ गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सामान्य तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच मासिक पासधारकांनाही सुविधा देण्यात आली आहे.

एक्स्प्रेस गाड्यांना सुविधा
पवन एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांसह १६७ गाड्यांना जनरल तिकीट मिळेल.

एसी गाड्यांना सुविधा नाही
संपूर्ण एसी गाड्या व राजधानी एक्स्प्रेसला जनरल तिकीटची सुविधा राहणार नाही. इतर सर्वच एक्स्प्रेस गाड्यांना जनरल तिकीटची सुविधा देण्यात आली आहे.

२९ जूनच्या रात्री पासून सुविधा
२९ जूनच्या मध्य रात्रीपासून जनरल तिकिटाची सुविधा सुरू होत आहे. रेल्वे बोर्डाकडून इतर सवलतधारकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सुविधेबाबत तूर्त आदेश नाहीत. - बी. अरुणकुमार, डीसीएम

बातम्या आणखी आहेत...