आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:शास्त्रीय गायन स्पर्धेत जॉर्ज; महाजन विजेते‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळजी जेठा महाविद्यालयात रविवारी‎ ‘तेज गंधर्व’ शास्त्रीय गायन राज्यस्तरीय‎ स्पर्धेचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र ‎ ‎ संगीत विभागातर्फे करण्यात आले होते.‎ स्वर्गीय तेजस नाईक स्मरणार्थ ही स्पर्धा‎ घेण्यात आली. स्पर्धेत लहान व मोठ्या‎ गटात ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.‎ लहान गटात प्रथम पारितोषिक शंकर‎ महाजन, द्वितीय चैताली पाटील, तृतीय‎ वरद ठाकूर तर उत्तेजनार्थ अमोघी‎ कुलकर्णीने बाजी मारली. मोठ्या गटात‎ प्रथम सोनी जॉर्ज, द्वितीय आलापिती पांडे,‎ तृतीय सौरभ गावंडे, उत्तेजनार्थ रोहित‎ पांचाळ यांना गाैरवण्यात आले.

या स्पर्धेचे‎ परीक्षण पंडित विश्वनाथ दाशरथे‎ (औरंगाबाद) आणि प्रमोद गणोरकर‎ (पुणे) यांनी केले. पारितोषिक वितरण‎ पंडित संजय पत्की याच्या हस्ते करण्यात‎ आले. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन‎ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे,‎ सांस्कृतिक समन्वयक शशिकांत‎ वडोदकर, मिलन भामरे, नितीन नाईक व‎ सुवर्णा नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.‎ सूत्रसंचालन प्रा. ईशा पांडे यांनी केले.‎संगीत विभागप्रमुख प्रा. कपिल शिंगाणे‎ यांनी आभार मानले. स्पर्धेच्या‎ यशस्वीतेसाठी प्रा. देवेंद्र गुरव व‎ विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. स्पर्धेसाठी‎ मुंबई, पुणे, आैरंगाबाद, कन्नड, अकोला,‎ जालना, मालेगाव, एरंडोल, भुसावळ,‎ चोपडा येथील स्पर्धक सहभागी झाले होते‎.

बातम्या आणखी आहेत...