आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Ghat To Put Up Advertisements In The City Again In The Bifurcation; Preparedness To Increase The Terms And Conditions From The Municipal Corporation| Marathi News

शहराचे विद्रुपीकरण:शहरात पुन्हा दुभाजकात जाहिराती लावण्याचा घाट; महापालिकेकडून अटीशर्ती वाढवण्याची तयारी

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅनर, हाेर्डिग्जच्या अतिवापराने शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. त्यात आता प्रशासन जाहीरातदारांसाठी मनपाची द्वारे खुली करण्याच्या तयारीत आहे. सन २००७पासून मनपा आयुक्तांनी दुभाजकात जाहिराती लावण्यास बंदी घातली हाेती. प्रशासन आपलाच निर्णय बदलवून दुभाजकांतील जाहीरातीच्या माध्यमातून महसूल गाेळा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यामुळे अपघात हाेऊ शकतात.

शहरात गेल्या दहा वर्षात महापालिकेची परवानगी न घेताच चाैकांत तसेच दुभाजकात बॅनर, जाहीराती लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने जाहीरातदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जाहीरातींमुळे शहर विद्रुपीकरण वाढल्याने नागरीकांच्या तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत.

मनपा यंत्रणा लक्ष ठेवणार
पालिकेकडून शहरातील काही दुभाजकांत जाहीराती लावण्याची परवानगी दिली आहे. वर्दळीच्या रस्त्यासंदर्भात धाेरण ठरवण्यात येणार आहे. अटी व शर्ती वाढवण्याचा विचार करू. महासभेत अंतिम निर्णय हाेईल.
प्रशांत पाटील, उपायुक्त

बातम्या आणखी आहेत...