आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फटाके, मिठाईसह गिफ्ट बाॅक्समुळे दरराेजच्या कचऱ्यात 20 टनाची वाढ

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाचे निर्बंध हटल्याने यंदाची दिवाळी सर्वांनीच धूमधडाक्यात साजरी केली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून कापड, मिठाई, गृहाेपयाेगी इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, फटाके, गिफ्ट आदी मार्केटमध्ये माेठी उलाढाल पाहायला मिळाली. या सर्व वस्तूंना आकर्षक बनवण्यासह संरक्षणासाठी प्लास्टिक आवरण व बाॅक्सेसचा वापर केला जाताे. नंतर या सर्व गाेष्टी कचऱ्यात जातात. या सर्व गाेष्टींमुळे महापालिकेकडून संकलित केल्या जाणाऱ्या दैनंदिन कचऱ्यात वीस टनाची वाढ झाली आहे.

जळगावकरांनी दिवाळी दणक्यात साजरी केली. त्यात गृहाेपयाेगी इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, गॅझेट, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी साडी, ड्रेसेस तयार कपडे, मिठाई, गिफ्ट बाॅक्सेस, फटाके यांच्या पॅकिंगसाठी पाॅलिथीन, प्लास्टिक, पुठ्ठ्याचे खाेके यांचा वापर केला जाताे. खरेदी केलेल्या वस्तू घरात आल्यानंतर प्लास्टिक, खाेके आदी कचऱ्यात जातात. हाच ताे कचरा दिवसाला २० टनापर्यंत वाढला आहे. दरम्यान, दिवाळीत मिठाई विक्री साठ टन झाली. कापड बाजारपेठेत दाेनशे काेटी, गिफ्ट बाॅक्स मार्केटमध्ये शंभर काेटी, इलेक्ट्राॅनिक्स मार्केटमध्ये दीडशे काेटींची उलाढाल झाली. या मालाच्या पॅकिंगचा कचराही माेठ्या प्रमाणात वाढला आहे.

आठ दिवसांपासून कचरा वाढला
शहरात नियमित कचऱ्याचे प्रमाण २८० टनापर्यंत असते. दिवाळीच्या अगाेदर आठ दिवसांपासून त्यात २० टनाची वाढ झाली आहे. तर नंतरही काही दिवस ती कायम असल्याचे महापालिकेचे सहायक आयुक्त अभिजित बाविस्कर यांनी सांगितले.

जळगावमध्ये यंदा तब्बल चार लाख ८० हजार किलाे वजनाच्या फटाक्यांची विक्री
फटाका असाेसिएशनचे कार्याध्यक्ष युसूफ मकरा यांच्या माहितीनुसार यंदा आठ काेटींच्या फटाक्यांची विक्री जळगावात झाली. पाच हजारांचेे फटाके एका बाॅक्समध्ये (कार्टून) येतात. या कार्टूनचे वजन ३० किलाे असते. आठ काेटींचे फटाके म्हणजे प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे १६ हजार कार्टून बसतात. एका कार्टूनचे वजन ३० किलाे असल्याने एकूण ४ लाख ८० हजार किलाे वजनाचे फटाके यंदा शहरात विकले गेले.

ते सर्वच फाेडले गेले असतील असे नाही; परंतु बहुतांश फाेडलेले असणार. फटाक्यांचे बाॅक्स, कागदी व प्लास्टिकचे वेस्टन यांचा कचरा रस्त्यावरच जाताे. फटाके फाेडल्यानंतर त्यातील दारू जळून राख हाेते. कागदी फटाक्यातील काही कागद जळतात. उर्वरित विखुरले जातात. राॅकेट आकाशात उडून पुन्हा खाली येऊन पडतात. फुलबाज्या जळाल्यानंतर त्याचे तार कचऱ्यात जातात. भुईचक्कर, अनार फाेडल्यानंतर कचऱ्यात जातात. त्याचे प्रमाण खूप जास्त नसले तरी दिवाळीत खरेदी हाेणाऱ्या इतर वस्तूंचे बाॅक्सेस व आवरणाचा कचराही असताे.

बातम्या आणखी आहेत...