आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव राज्याचे ग्रामविकासमंत्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावातील १० उमेदवारांचा प्रचार केला. त्यापैकी सात उमेदवार निवडून येणे अपेक्षित असताना पाचच उमेदवार निवडून आले. आम्ही कर्नाटकात कमी पडल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
महाजनांनी प्रचार केलेल्या कोणत्या जागा निवडून आल्या, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. जिल्हा दूध संघात एका उद्घाटन कार्यक्रमानिमित्त मंत्री महाजन आले होते. त्यावेळी कर्नाटक निकालावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले महाजन?
कर्नाटक निकालात काँग्रेसने मुसंडी मारलेली आहे. बहुमताने सत्तेत आली. आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही तेथे कमी पडलो. त्या संदर्भात राज्य भाजप, केंद्रीय नेते मंथन करतील. आत्मपरीक्षण असे म्हणता येणार नाही. अॅन्टी इन्कबन्सीमुळे आम्ही तेथे हरलो आहोत. कर्नाटकात द्वेषाचे दुकान बंद झाले, प्रेमाचे दुकान सुरू झाल्याच्या राहुल गांधी यांच्या विधानावर मंत्री महाजन म्हणाले, एखाद्या राज्यात काँग्रेस जिंकली आहे. उत्तर प्रदेशात तुमचे प्रेम का उतू आले नाही. बऱ्याच वर्षांनी काँग्रेसला विजय मिळालेला असल्याचे देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
राऊत बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना
संजय राऊत यांनी बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली असे विधान केल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर राऊतांनी राज्यात काहीतरी करून दाखवावे. तुम्ही कुठे आहात, भविष्यात कोठे राहाल, याचा शोध त्यांनी घ्यावा. उगाच तोंडसुख घेत आहेत. बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना, शेजाऱ्याला मुलगा झाला म्हणून पेढे वाटायचे, तुमच्या घरात काय आहे. तुम्ही तर वांझोटे आहात, तिकडे लक्ष घालावे, अशी टीका देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
एकनाथ खडसेंची कमालच वाटली
महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात कर्नाटकच्या जनतेने कौल दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. त्यावरही महाजनांनी प्रत्युत्तर दिले. खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये बघावे. बाजार समिती निवडणूक जिंकली तर पोकलॅनवर मिरवणूक काढतात. राज्यस्तरीय नेता बाजार समिती निवडणूक जिंकल्यानंतर पोकलॅनवर लावून नाचला. मला तर कमालच वाटली. तुम्ही तुमच्या मतदार संघापुरते बघा, असा सल्ला त्यांनी खडसे यांना दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.