आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजन अडचणीत:भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात चाकूचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगावमधील संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावल्याचा आरोप

भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी महाजन यांनी धमकावल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅडव्होकेट विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावमधील मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये भोईटे गटाकडून अॅडव्होकेट विजय पाटील यांना धमकावल्या प्रकरणी विजय पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव मधील मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचा ताबा गिरीश महाजनांना हवा आहे. त्यासाठी ते 1 कोटी द्यायला तयार आहेत. मात्र, विजय पाटील यांनी नकार दिल्यानंतर चाकूचा धाक दाखवत मारहाण केल्याचे विजय पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. हे प्रकरणात आता पुण्यातील कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...