आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:प्रवेश घेताना बनावट प्रमाणपत्र दिल्यास फौजदारी गुन्हा ठरणार, डीटीईने 2023-24 च्या प्रवेशासाठी निर्देश केले जारी

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये काही विद्यार्थ्यांनी तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जात / जमात प्रमाणपत्र, जात वैधता, अपंगत्व, नॉन क्रिमिलेअरचे बोगस, बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता सहा वर्षांनंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पुन्हा एकदा हे निर्देश जारी केले. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सुरू असून यावर्षी संबंधित कागदपत्रे कुठून व कसे तयार करून घ्यावे? याबाबत देखील डीटीईने मार्गदर्शन केले आहे.

डीटीईच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी, पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी, औषध निर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम तसेच प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी / तंत्रशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष डी-फार्म, वास्तुशास्त्र आदी अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येत आहेत. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन ती तयार ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी हे निर्देश जारी केले.